HW News Marathi
राजकारण

राफेलबाबत संरक्षणमंत्री एका पाठोपाठ एक खोटे बोलत आहेत !

नवी दिल्ली | “राफेलबाबत संरक्षणमंत्री एका पाठोपाठ एक खोटे बोलत आहेत. परंतु, त्या माझ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाहीत”, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राफेल विमान खरेदी करार प्रकरण देशभरात चांगलेच गाजत आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेला हा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.

”एकाही राफेल विमानाचा पुरवठा करण्यात आलेला नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसॉल्ट कंपनीला २० हजार कोटी रुपये दिले. परंतु, हिंदुस्थान एरोनॉटिक्सला थकीत असलेले १५,७०० कोटी रुपये देण्यास नकार दिला आहे. अखेर हिंदुस्थान एरोनॉटिक्सला आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी १००० कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागले”, असेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले केले होते . त्याचप्रमाणे राफेल करारासंदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले होते.

बहुचर्चित राफेल विमान खरेदी करारबाबत आपली भूमिका संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी भाजपकडून देशभरात तब्बल ७० पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

Aprna

भाजपने २००४ ची लोकसभा निवडणूक विसरू नये | सोनिया गांधी

News Desk

‘ये दोस्ती आगे भी चलती रहेगी’, तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna