HW News Marathi
राजकारण

आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा पॉलिटिकल स्टंट !

नवी मुंबई | देशातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाचे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी स्वागत केले असले तरी केंद्राचा हा निर्णय म्हणजे एक पॉलिटिकल स्टंट असल्याचीही टीका देखील मायावती यांनी केली आहे.

“केंद्राने घेतलेला हा निर्णय चांगला असला तरी या निर्णयामागची सरकारचा सरकारचा हेतू चांगला नाही. हा एक पॉलिटिकल स्टंट आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे”, असे मायावती म्हणाल्या. त्याचप्रमाणे इतर आर्थिकदृष्ट्या मागास अल्पसंख्यांकांना देखील या आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदनामीकारक वक्तव्य केल्याने अण्णा हजारेंची नवाब मलिक यांना नोटीस

News Desk

साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा आज होणार फैसला

News Desk

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशींनी केली पंतप्रधान मोदींवर जातीय टिका

News Desk