HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून संप

मुंबई | आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी ( ७ जानेवारी) मध्यरात्री पासून बेस्टचे ४५ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे आज (८ जानेवारी) सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल झाले. बेस्टच्या संपाचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी शेअरच्या माध्यमातून दामदुप्पट भाडे आकारत आहेत. तर काहींनी चालत स्टेशन पर्यंत जाणे पसंत केले. चर्चगेट आणि सीएसएमटी येथे उतरून अनेकांनी दामदुप्पट भाडे देऊन आपल्या कार्यालयापर्यंत प्रवास केला. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी ११ वाजता महापौरांच्या अध्यक्षतेखाली “बेस्ट युनियन” ची बैठक होणार आहे.

वेतनवाढ, वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका ‘अ’ अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटना यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनीच हजेरी लावली नाही. संपाचा फटका मुंबईतील जवळपास २५ लाख प्रवाशांना बसणार असल्याने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्र्रकुमार बागडे यांनी दिला आहे.

या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • बेस्टचा ‘क ‘अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या ‘अ ‘अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
  • २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,३९० रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
  • एप्रिल १६ पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
  • २०१६-१७ आणि १७-१८ साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
  • अनुकंपा भरती तातडीनं सुरू करावी

बस्टे कर्मचाऱ्यांचा संपामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी मुंबईकरांच्या मदती सकाळपासून धावत आहे. मुंबईतील विविध ठिकाणाहून ४० बस सुरू केल्या आहेत.

एसटी मुंबईकरांच्या मदतीला

  • कुर्ला पश्चिम ते बांद्रा – ०५ बसेस
  • कुर्ला पूर्व ते चेंबूर – ०५ बसेस
  • दादर ते मंत्रालय – ०५ बसेस
  • पनवेल ते मंत्रालय – ०५ बसेस
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय – ०५
  • ठाणे ते मंत्रालय – १५

एकूण 40 बसेस सध्या धावत आहेत, गरजेनुसार आणखी जादा बसेस सोडण्यात येतील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षल समर्थकांच्या अटकेसंदर्भात महाराष्ट्र पोलिसांची पत्रकार परिषद

News Desk

अमेझानच्या कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या वस्तूची चोरी

swarit

तीन वर्षांत राज्यात शालेय शिक्षणाची घसरण

News Desk