HW News Marathi
क्रीडा

Birthday Special : ‘टायगर’ पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात तरुण कर्णधार

मुंबई | सौरभ गांगुली आणि विराट कोहली या भारतीय संघाच्या कर्णधारांच्याही आधी भारतीय संघातील प्रसिद्ध कर्णधार असलेल्या ज्याने परदेशातही भारतीय संघाच्या यशाचा डंका वाजवला ते कर्णधार मंसूर अली खान पतौडी. त्यांची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामुळे त्यांना “टायगर” असे टोपणनाव मिळाले होते. भारतातील महान कर्णधारांपैकी एक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.

टायगर पतौडी यांच्या नेतृत्वात भारताने परदेशी भूमीवर आपली पहिली विजयी पताका फडकविली होती. पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९६८ मध्ये न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पराभूत केले होते.

मंसूर अली खान पतौडी साम्राज्याचे नवाब होते. त्यांचा जन्म ०५ जानेवारी १९४१ रोजी भोपाळ, मध्यप्रदेश येथे झाला आणि त्यांनी २२ सप्टेंबर २०११ रोजी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.मंसूर अली खान हे भारतातील सर्वात तरुण कर्णधार होते. २१ वर्षे ७७ दिवस इतक्या कमी वयात त्यांनी भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

swarit

बांगलादेशचा पराभव करुन भारतीय क्रिकेट टीमची फायनलमध्ये धडक

News Desk

संजय बर्वे  मुंबई पोलीस आयुक्त तर सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक पदी नियुक्त

News Desk