HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला आहे. उड्डाणापूर्वीच बिघाड असल्याचे लक्षात आल्याने पुढील अनुचित प्रकार टळला आहे. परंतु या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला विलंब झाला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव इथे जाणार होते. १० वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचणार होते. परंतु दोन तासांनंतरही मुख्यमंत्री न आल्याने, याविषयी चौकशी केली असता, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दोन वर्षातील ही सहावी घटना आहे. लातूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होते. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात भरकटले देखील होते.

मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरचे विघ्न

लातूर – २५ मे २०१७ लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळले. अलिबाग – ७ जुलै २०१७ हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला.

नाशिक – ९ डिसेंबर २०१७ हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

भाईंदर – ११ जानेवारी २०१८ हेलिकॉप्टर मार्गात केबल आल्याने लँडिंग होणाऱ्या हेलिकॉप्टरने पुन्हा टेक ऑफ केले.

सांगली – २४ ऑक्टोबर २०१८ हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चकरा मारत होते.

मुंबई – ३ जानेवारी २०१९ उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड. परिणामी त्यांच्या नियोजित सातारा दौऱ्याला विलंब झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी इटलीत जा !

News Desk

चिक्की पाठोपाठ आता मोबाईल घोटाळा, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप

News Desk

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk