ठाणे | देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज असताना ठाणे येथील कोपरी भागात काल (३१ डिसेंबर) रात्री एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये रसिका डेकोरेटर्सचे गोदाम जळून खाक झाले असून ही आग रात्री दीड वाजण्याच्या सुमारास लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या होत्या. परंतु आगीने तोपर्यंत रौद्र रुप धारण केले होते. त्यामध्ये हे गोदाम जवळ-जवळ संपूर्णपणे जळून खाक झाले.
अग्नीशामक दलाच्या जवानांनी ही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून ही आग नेमकी कशामुळे याचे कारण अद्याप कळाले नाही. परंतु शॉर्ट सर्किटने आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमके कारण मात्र नंतर समोर येईल. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार या आगीमध्ये कुणीही जखमी झाले नाही. ठाणे परिसरात अलिकडच्या काळात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोक धास्तावले आहेत. गेल्या वर्षी कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर वर्षभरात मुंबईत आग्नंताडव सुरूच होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.