HW News Marathi
मनोरंजन

FlashBack 2018 : २०१८ मध्ये हे कलाकर वादाच्या भौ-यात अडकले

पद्मावत : संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला होता. दिपिका पदुकोनने नृत्य केलेल्या ‘घुमर’ या गाण्याला अनेकांनी विरोध केला होता.

 

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर : यावर्षी,म्हणजे 2018 मध्ये तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर #MeTooIndia या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये सोशल मिडीया द्वारे अनेक महिलांनी आपल्यावर झालेले अन्यायाला वाचा फोडली होती.

 

 

सलमान खान : राजस्थानच्या गँगस्टर लॉरेंस बिश्नोई यांनी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. फक्त एवढेच नव्हे तर, शस्त्रांसह रेस 3 च्या सेटवर येऊन काही लोकांनी गोंधळ केला होता त्यानंतर शूटिंग बंद करावी लागली होती.

 

 

पापोन : संगीत रियलिटी शो दरम्यान अल्पवयीन गायकाला गायनानंतर ‘किस’ केलेला व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर सिंगर पापोनवर टीका झाली होती.

 

केदारनाथ : सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या केदारनाथ या सिनेमाला देखील टीकेचा सामना करावा लागला होता. केदारनाथ पुरोहितचे अध्यक्ष विनोद शुक्ला यांनी एकदा म्हटले होते, “जर चित्रपटावर बंदी घातली नाही तर आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत कारण आम्हाला सांगण्यात आले आहे की या चित्रपटामुळे लव्ह जिहादचा प्रसार करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन : चित्रपट ‘पॅडमॅन’ ज्याचे संपूर्ण देशात प्रचंड कौतुक झाले होते. परंतु, हा चित्रपट देखील वादाच्या भौ-यात अडकला होता. अक्षय कुमारविरूद्ध एफआयआर नोंदविणा-या रिपू दमण जयस्वाल यांनी चित्रपटातील काही दृश्ये त्यांच्या स्क्रिप्टमधून घेण्यात आली असल्याचे म्हटले होते.

लवयात्री : सलमान खानच्या होम प्रोडक्शनमध्ये तयार करण्यात आलेला चित्रपट ‘लवयात्री’ वादाच्या भौ-यात अडकला होता.या चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) विरोध केला होता. या चित्रपटाचे नाव हिंदू सण असलेल्या ‘नवरात्रि’ याचा अर्थ विकृत अर्थ लवरात्री होत असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते. सलमानने शेवटी या चित्रपटाचे नाव बदलून ‘लवयात्री’ असे केले.

कॉमेडियन कपिल शर्मा : कॉमेडियन कपिल शर्मा जो सर्वांचा आवडता अभिनेता आहे. तो यंदा अनेक कारणांनी वादाच्या भौ-यात अडकला होता. एका ऑडिओ कॉल दरम्यान पत्रकाराशी असभ्य भाषेत बोलल्यामुळे कपिल वादाच्या भौ-यात अडकला होता. त्याच्या सर्वांनी टिका देखील केली होती.

 

कंगना राणावत : द क्वीन ऑफ झांसी’ हा २०१९ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. हा चित्रपट नेहमीच विवादाच्या भौ-यात अडकला आहे. मुख्य भागांचे चित्रिकरण केल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांना फिल्ममधून वगळण्यात आले तेव्हा चाहत्यांना आश्चर्य वाटले. कंगनाने अभिनेत्यावर काही आरोप केले आहेत.

जितेंद्र : बॉलीवूडचे अभिनेते दिग्दर्शक जितेंद्र देखील यावर्षी चर्चेचा विषय ठरले होते. जेव्हा शिमला पोलिसांनी लैंगिक छळ प्रकरणी जितेंद्र याच्यावर एफआयआर दाखल केले होते. जितेंद्रच्या दूरच्या चुलत भावांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. ४७ वर्षांपूर्वी जेव्हा ते दोघे शिमला येथे खोलीत राहत होते तेव्हा हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले होते.

Related posts

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने करणार सन्मानित

News Desk

महात्मा गांधींना नोबेल का मिळाला नाही ?

News Desk

सिनेतारका मीनाकुमारीही होती तिहेरी तलाकची बळी!

News Desk