HW News Marathi
राजकारण

कुमारस्वामी ‘अ‍ॅक्सिडेंटल सीएम’, भाजपचा टोला

नवी दिल्ली | ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटावरून सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या चित्रपटावरून आता भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. आता या चित्रपटाच्या नावाचा वापर करून भाजपकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. कर्नाटक भाजपने कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना ‘द अ‍ॅक्सिडेंटल सीएम’ संबोधले आहे. ‘जर ‘अ‍ॅक्सिडेंटल सीएम’ अशा नावाचा चित्रपट बनविण्यात आला तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भूमिका कोण करणार ?’ असा खोचक सवाल कर्नाटक भाजपने कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना केला आहे.

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे एचडी कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे, कर्नाटक भाजपने कुमारस्वामी यांना ‘द अ‍ॅक्सिडेंटल सीएम’ असे संबोधले आहे. दरम्यान ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने या चित्रपटाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

“ज्या पंतप्रधानांनी अत्यंत अवघड परिस्थितीतून देशाला वाचविले त्या मनमोहन सिंग यांना ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ असं संबोधले जात आहे. परंतु, आताच्या पंतप्रधानांनी तर देशाचाच अ‍ॅक्सिडेंट केला आहे”, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे – धनंजय मुंडे

News Desk

‘पवार साहेबांच्या गुप्‍त भेटीवेळी २००० साल का आठवलं नाही’

News Desk

“कोणाचे बटण दाबायचे, हे बारामतीकरांना खूप चांगले माहिती”, अजित पवारांचा बावनकुळेंना टोला

Darrell Miranda