HW News Marathi
देश / विदेश

राम भक्तांसाठी मोदी सरकार बनवणार मुव्हिंग ब्रीज, पहा व्हिडीओ

नवी दिल्ली | मोदी सरकार रामेश्वरम-धनुष्कोडी रेल्वे मार्ग पुन्हा तयार करणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक पूल देखील बांधण्यात येणार आहे. या पुलाचे नाव पंबन ब्रीज असे असणार आहे. या पुलावरुन रेल्वे जाईल आणि आवश्यकतेनुसार पूल या ठिकाणावरुन हलविता देखील येणार आहे जेणेकरुन या पुलाखालून जहाजांना जाता येमार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला.

काय तुम्ही कधी मुव्हिंग ब्रीज पाहिला आहे ? असा सवाल पियुश गोयाल यांनी भारतीयांना सोशल मियाद्वारे विचारला आहे. त्याचबरोबर रामेश्वरला भारताच्या भूमी सोबत जोडणारा पंबन ब्रीज आवश्यकतेनुसार हलविता येणार आहे. जेव्हा या ठिकाणाहून माल वाहतूक जहाजे जाणार आहेत त्यावेळी हा ब्रीज गरजेनुसाक खाली वर करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा यामध्ये निर्माण होणार नाही असेही रेल्वे मंत्री गोयाल यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्र्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला सोशल मिडीयावर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या ब्रीजचा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण या व्हिडीओची तारीफ करताना पहायला मिळत आहे.

हा मार्गमध्ये केंद्रसरकारने राम भक्तांना दिलेली मोठी भेट समजला जात आहे. रामेश्वरम-धनुषकोडी सेक्शन वर असलेला हा रेल्वे मार्ग १९६४मध्ये समुद्री वादळात वाहून गेला होता. हा प्रोजेक्ट पुर्ण झाल्यानंतर रामसेतु पर्यंत रेल्वेंने पोहचणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या या प्रोजेक्ट ला पुर्ण करण्यासाठी ४५८ करोड इतका खर्च येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कश्मीरमध्ये भाजपच्या सचिवाची गोळ्या झाडून हत्या

swarit

कश्मीरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ जवान शहीद

News Desk

कुणी मुद्दामहून आमच्या वाटेला आले तर आम्ही त्याला सोडत नाही !

News Desk