HW News Marathi
मुंबई

राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘बॉण्ड’ या अत्यंत लाडक्या कुत्र्याचे आज दुपारी निधन झाले आहे. परळच्या प्राणी रुग्णालयात बॉण्डवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी परळच्या प्राणी रुग्णालयात बॉण्डवर अंत्यसंस्कार केले आहेत. शर्मिला ठाकरे यांचा चावा घेतल्याने राज ठाकरे यांनी बॉण्डला त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर ठेवले होते.

तब्बल गेली साडेबारा वर्षे बॉण्ड हा राज ठाकरे यांच्यासह होता. मात्र, राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर राज ठाकरे यांनी बॉण्डला त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर ठेवले होते. राज यांच्याकडे ग्रेट डेन जातीचे जेम्स आणि बॉण्ड असे दोन कुत्रे होते. या जेम्स आणि बॉण्डच्या पिल्लांचे ज्युनिअर जेम्स आणि बॉण्ड असे नामकरण करण्यात आले. राज ठाकरे यांच्या कुटुंबात ९ ते १० कुत्रे असल्याचे म्हटले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिनेट निवडणूकीतील नोंदणीचे पन्नार हजार शुल्क मुंबई विद्यापीठाने लाटले

News Desk

ठाण्यात मिसळ महोत्सवाचेभव्य आयोजन

News Desk

रेल्वेत मराठी तरुणांना नोक-या मनसेमुळेच | राज ठाकरे

News Desk