HW News Marathi
देश / विदेश

नासाच्या कॅलेंडरसाठी भारतीय मुलांनी रेखाटलेल्या चित्रांची निवड

नवी दिल्ली | कमर्शियल क्रू कार्यक्रमांतर्गत नासाकडून येत्या नववर्षासाठी तयार करण्यात आलेल्या कॅलेंडरमध्ये भारतीय मुलांनी रेखाटलेल्या चित्रांची दखल घेण्यात आली आहे. नासाच्या या कॅलेंडरच्या मुखपृष्ठावरच उत्तर प्रदेशमधील अवघ्या नऊ वर्षांच्या दीपशिखाने रेखाटलेले चित्र छापण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कॅलेंडरमध्ये महाराष्ट्रातील दोन मुलांनी रेखाटलेल्या चित्राचा देखील समावेश करण्यात आला आहे. अंतराळातील जीवन ही नासाच्या यंदाच्या कॅलेंडरची थीम आहे.

अंतराळात वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांच्या कामाचे महत्त्व या लहान मुलांपर्यंत पोहोचावे, यासाठी हे कॅलेंडर तयार करण्यात आल्याचे नासाने म्हटले आहे. महाराष्ट्रातील इंद्रयुद्ध (१० वर्षे) आणि श्रीहन (८ वर्षे) या दोन मुलांनी मिळून रेखाटलेल्या चित्राचा नासाच्या या कॅलेंडरमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूतील थेमुकिलिमनच्या (१२ वर्षे) चित्राचा देखील या कॅलेंडरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नासाच्या कॅलेंडरसाठी अंतराळ, अंतराळातील जीवन, अंतराळात चालणारे कामकाज, अंतराळातील खाद्य अशा विविध विषयांवर या लहान मुलांकडून चित्र रेखाटण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सकाळचा नाष्टा गडकरींच्या घरी; एकनाथ खडसे, रक्षा खडसे गडरींच्या भेटीला

News Desk

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

शाहिद अब्बासी पाकचे नवे पंतप्रधान

News Desk