HW News Marathi
देश / विदेश

Surgical Strike : मेजर जनरल लैंगिक छळ प्रकरणी दोषी

नवी दिल्ली | भारतीय लष्करातील एका मेजर जनरलने कॅप्टन पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी या मेजर जनरलला कलम ३५४ अ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले असून त्याला लष्करातून बडतर्फ करण्याची शिफारस देखील आर्मी जनरल कोर्ट मार्शलकडून करण्यात आली आहे. या मेजर जनरलने भारतीय सैन्याकडून २०१६ साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

२०१६ मध्ये लष्करप्रमुखांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या गटबाजीचा मी बळी ठरत असल्याचे म्हणत या मेजर जनरलने महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आलेले लैंगिक छळाबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, याप्रकरणी मेजर जनरलचे म्हणणे समजून न घेता, पुराव्यांची योग्यरित्या पडताळणी न करता घाईने निकाल देण्यात आल्याचा आरोप करत या निकालाला आव्हान देणार असल्याचे मेजर जनरल यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार

News Desk

राम मंदिरसाठी ‘ट्रस्ट’ची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे अभिनंदन

swarit

पंतप्रधानांसोबतची बैठक सकारात्मक झाली, मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती

News Desk