HW News Marathi
मुंबई

मुंबईतील कांदिवलीसह भिवंडीत अग्नितांडव

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबई आगीचे सत्र सुरूच आहे. आज (२३ डिसेंबर) पुन्हा एकदा मुंबईतील कांदिवली आणि भिंवडी या दोन ठिकाणी भीषण आगा लागील. कांदिवलीच्या दामू नगरमधील एमआयडीसीतमध्ये आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. ही आग कशी लागली यांची माहिती अद्याप मिळाली नाही. तर या आगीत किती जण जखमी झाले यांनी देखील माहिती मिळाली नाही. कांदिवलीमध्ये लागलेली आही ही दुसऱ्या लेव्हलची असल्याची माहिती मिळाली आहे.

भिवंडीतील भीषण आगीत ११ गोदामे जळून खाक झाली आहेत. गुंदवलीतील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली आहे. या आगीचा प्लास्टिकचे गिफ्ट्स आणि खेळण्यांच्या गोदामांना बसला आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग विझवण्यासाठी ३ ते ४ तास लागण्याची शक्यता आहे. या आगीमुळे गुंदवली ग्रामपंचायत हद्दीत धुराचे लोट पसरले आहेत. आग कशी लागली असून या आगीत किती जण अडकले आहेत, यांची माहिती अद्याप मिळाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा संपन्न

News Desk

उच्च न्यायालयाची राजकीय पक्षांना नोटीस

Gauri Tilekar

मध्य रेल्वेच्या मुलंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

News Desk