HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचा आज एकदिवसीय अमरावती दौरा, विदार्भात मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून अमरावती दौऱ्यावर आहेत. शरद पवार हे आज (१० एप्रिल) सकाळी नागपुरात दाखल झाले. यावेळी शरद पवारांचे मोठ्या जल्लोषात नागपूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. मुंबईतील पवारांच्या घराव एसटी कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा असून या पार्श्वभूमीवर ६ जिल्ह्याचे पोलीस पवारांच्या सुरक्षेसाठी अमदारावतीमध्ये तैनात करण्यात आले आहेत.   

शरद पवारांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर बॅनर लावण्यात आले असून पवार यांचा अमरावतीमध्ये एकदिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पवार हे आज दुपारी १ वाजता अमरावतीत आगमन होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या भेटीसाठी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या घरी भेटीसाठी जाणार असून ५ ते ७ सायंकाळी कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.

अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाज जिल्ह्याचे पदाधिकारी येणार असून राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे, मनोहर नाईक, एकनाथ खडसे यांच्यासह पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्याचे प्रमुख नेते पदाधिकारी हे उपस्थित राहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ चंद्रकांत पाटलांचा मुश्रीफांना सवाल!

News Desk

अखेर ‘हे’ खाते मिळाल्यानंतर विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

News Desk

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk