HW News Marathi
मनोरंजन

नाताळ स्पेशल डेझर्ट

ख्रिश्चन समुदाय भारतात मोठ्या प्रमाणात नसला तरी भारतात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व ख्रिश्चन बांधव आपली घरे सुशोभित करातात. या उत्सवासाठीची तयारी आठवडाभरपुर्वीपासुनच सुरु होते. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मित्र परीवारात भेटींचे आयोजन केले जाते. उत्सव कुठलाही असू द्या तो विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांशिवाय अपुर्णच. चमचमीत असे, तर काही तोंड गोड करणारे असे मिष्टान्न असले की उत्सवाची रंगत काही औरच असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नाताळ उत्सवासाठी केल्या जाणाऱ्या अशाच काही खास पाककृती.

साहीत्य

1 साखर एक वाटी

2 थोड पाणी

एक वाटी दुध

अर्धी वाटी कोको पावडर

२ चमचे लोणी

६ ते ७ बादाम, थोडे मनुके आणि पिस्ता

कृती

1 एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून गरम करायला ठेवा

त्यात थोडे लोणी घालुन ढवळुन घ्या

2 साखर पुर्ण विरघळली की त्यात हळू हळू कोको पावडर टाका व हे मिश्रण सतत ढवळत राहा.

3 त्या मिश्रणात दुध घाला आणि अजुन थोडा वेळ ढवळून घ्या

4 मिश्रण पुर्ण तयार झाले की एका वाटीत काढून घ्या आणि त्यामधे वरुन मनुका, बादाम आणि पिस्ता घाला.

स्पेशल डेझर्ट तयार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेहरु सेंटरमध्ये निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk

शहरूखकडून सलमानला अनोखी भेट

News Desk

मल्लिकाने घेतली फस्ट लेडीची भेट

News Desk