जयपूर | “तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. फक्त थोडा वेळ थांबा. तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेताना नैसर्गिकरित्या वेळ लागतोच”, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या तीन मोठ्या राज्यांमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता काँग्रेसपुढे या राज्यांचे मुख्यमंत्री ठरविण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे.
Ashok Gehlot, Congress: I appeal to workers to maintain calm, they have worked very hard, whatever decisions will be taken will be binding on all. Rahul ji is talking to and consulting all leaders pic.twitter.com/CUvp7wPWDC
— ANI (@ANI) December 13, 2018
Ashok Gehlot, Congress: The decision will be taken soon, there is nothing to worry. Just wait, the decision has to be taken on CMs of three states so naturally, it takes time. Party president will take a call pic.twitter.com/Wrhz1lQB96
— ANI (@ANI) December 13, 2018
या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आक्रमकता दिसून येत आहे. आपापल्या नेत्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येत आहे. म्हणूनच अशोक गेहलोत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “मी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करतो. कार्यकर्त्यांनी या निवडणुकांसाठी खूप कष्ट घेतले आहेत. जो काही घेतला जाईल तो आपल्यासाठी बंधनकारक असेल. याबाबत राहुल गांधीची सर्व नेत्यांशी चर्चा सुरु आहे”, असेही यावेळी गेहलोत यांनी सांगितले आहे. दरम्यान, करौली भागात सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको करण्यात आले आहे. सचिन पायलट यांनी देखील आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.