नवी दिल्ली | छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसला ४० जागांनी आघाडेत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर भाजपला १५ जागा मिळाल्या आहेत. तर जनता काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे आज (११ डिसेंबर) मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे.
Official ECI trends: Congress leading on 40 seats, BJP leading on 15 seats, Janata Congress on 5 seats in Chhattisgarh. #AssemblyElections2018 pic.twitter.com/2E2siBY5zV
— ANI (@ANI) December 11, 2018
गेल्या १५ वर्षापासून छत्तीसगढमध्ये भाजपची सरकार आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार येणे हा भाजपला खूप मोठा झटका आहे. छत्तीसगढमध्ये तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले रमण सिंह हे राजनंदगावमधून पिछाडीवर आहेत. रमण सिंह यांना काँग्रेसचे करूणा शुक्ला टफ फाईट देत आघाडी मिळाली आहे. मतमोजणीत दोघेही जण कधी आघाडी तर कधी पिछाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
According to official ECI trends, former Chhattisgarh CM Ajit Jogi is at third position at Marwahi. BJP is leading and Congress at second ( file pic) #ChhattisgarhAssemblyElections2018 pic.twitter.com/fhzR0IZIKl
— ANI (@ANI) December 11, 2018
छत्तीसगढचे मजी मुख्यमंत्री अजित जोगीही मारवाही या मतदार संघातून पिछाडीवर पडले आहेत. या मतदार संघात भाजपचा उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगढमध्ये एकूण ९० जागा असून बहुमतासाठी ४६ जागांची गरज आहे. सध्या काँग्रेसला ४० जागा मिळाल्या असून भाजपला १५ जागा तर जनता काँग्रेसला ५ जागा मिळाल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.