HW News Marathi
राजकारण

शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणारा छिंदम तडीपार असूनही विजयी

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ मधून २००० पेक्षा जास्त मतांसह विजय मिळाला आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली. भाजप उमेदवार प्रदीप परदेशी या पराभूत करून छिंदमने यश मिळविले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत छिंदमने अपशब्द काढल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर संतप्त टीका झाली होती. त्याचमुळे छिंदमला भाजपमधून बाहेरची वाट दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्याने अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. धक्कादायक म्हणजे छिंदमवर गुन्हा दाखल असून तो तडीपार आहे. तरीही, या निवडणुकीत जनमत छिंदमच्याच बाजूनेच झुकलेले दिसते.

या प्रभागात छिंदम विरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (शिवसेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या मतदार यादीमध्ये सुमारे ८ ते ९ लाख बोगस मतदार !

News Desk

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Aprna

नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज

News Desk