HW News Marathi
राजकारण

हे सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवाल का ?, अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

धुळे | “मी तुमच्यावर विश्वास ठेवला त्याची परतफेड तुम्ही विश्वासघात करून केलीत. माझ्या ४७ महिन्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मी काय चूक केली, ते सांगा. मला दिलेला एकही शब्द तुम्ही पाळला नाहीत, हे सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवाल का ?”, असा सवाल भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना एका खुल्या पत्राद्वारे केला आहे. अनिल गोटे यांच्या गाडीवर शनिवारी (८ डिसेंबर) रात्री हल्ला करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अनिल गोटेंची प्रकृती खालावल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

“तुमचे सरकार आहे. खोट्या केसेस दाखल करून मला हैराण करा. माझ्या शुभेच्छाच आहेत”, असेही अनिल गोटे यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, हा हल्ला भाजपच्याच गुंडांनी केल्याचे सांगत आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांवर देखील आरोप केले आहेत. “माझ्या गाडीवर दुसऱ्या तिसरा कोणी नव्हे तर भाजपच्या गुंडांनीच हल्ला केला आहे. पोलिसच चोर आहेत, विकले गेलेले आहेत. ते काय गुन्हा दाखल करणार ? ” असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी पोलिसांवर केला आहे.

आमदार अनिल गोटे हे कल्याण भवन येथे असताना शनिवारी रात्री १०.३०च्या सुमारास त्यांचे वाहन क्रमांक एमएच १८ एजे ३३६६ त्यांचे चालक साजिद खान या परिसरातून बाहेर काढत होते. याचवेळी २ जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली. या घटनेत गाडीची काच फुटलेली होती. त्यावेळी गाडीमध्ये अनिल गोटे नसल्यामुळे ते बचावले. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे त्यांची प्रकृती बिघडली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे हे घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त होऊन आमदार गोटे यांच्या समर्थकांनी भाजप नेत्यांविरोधात घोषणा दिल्या.

गेल्याच महिन्यात भाजप आमदार अनिल गोटे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यत्त्वासोबतच भाजपमधूनही आपला राजीनामा दिला होता. पक्षामध्ये सध्या गुन्हेगारांची भरती झाली आहे, असे कारण देत अनिल गोटे यांनी राजीनामा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

११ वाजेपर्यंत राजस्थानात २२ तर तेलंगणात २३ टक्के मतदानाची नोंद

News Desk

नरेंद्र पाटील यांच्या ‘मातोश्री’ भेटीत नेमके दडलय काय ?

News Desk

प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी ठरणार ?

News Desk