मुंबई | “माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझा दुःस्वास करणा-यांनी माझ्यावर हा हल्ला केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हा प्रकार घडला आहे,” असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्रयांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले असून आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रामदास आठवले यांच्यावर शनिवारी (८ डिसेंबर) रात्री अंबरनाथ येथील एका कार्यक्रमात एका तरुणाने हल्ला केला. या संपूर्ण प्रकाराबाबत रामदास आठवले यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत.
Ramdas Athawale on him being slapped by a worker of RPI(A) at an event in Thane y'day: I'm a popular leader,this might have been done at behest of someone angry over something. Security arrangement there wasn't adequate. I'll meet CM over this incident. It should be investigated. pic.twitter.com/Btud6fvU2s
— ANI (@ANI) December 9, 2018
रामदास आठवले हे शनिवारी संविधान गौरव दिनानिमित्त अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात हजर राहिले होते. रात्री १० च्या सुमारास हा कार्यक्रम संपल्यानंतर आठवले मंचावरून खाली उतरत असताना एका तरुणाने त्यांच्या अंगावर धावून येत त्यांच्या कानशिलात लगावली. या तरुणाचे नाव प्रविण गोसावी असे असून रामदास आठवलेंच्या समर्थकांनी या तरुणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला असून उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
#WATCH Maha: People thrash Pravin Gosavi, a worker of the youth wing of Republican Party of India, who slapped Union Minister & party leader Ramdas Athawale at an event in Thane y'day. Gosavi has been admitted to a hospital. FIR registered against him, investigation on. (08.12) pic.twitter.com/zvYmNaV8Wi
— ANI (@ANI) December 9, 2018
मराठा आरक्षणाबाबत रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून या तरुणाने रामदास आठवलेंवर हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हा तरुण त्याच्या सोशल मीडियावर देखील आठवलेंच्या विरोधात बरेच लिहीत होता अशी देखील माहिती मिळत आहे. आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर आज अंबरनाथमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.