HW News Marathi
मुंबई

रविवारी मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप धिम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू राहील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील व २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्गवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला व वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या मार्गावरील जलद अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल व या कालावधीत या गाड्या अप व डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

मध्य रेल्वेच्या निळजे ते कळंबोली स्थानकादरम्यान विशेष

रविवारी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचा नियमित मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलेला असताना निळजे-कळंबोली मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी आणि मंगळवारी या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने अनेक या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला असून काही गाड्या रद्द केल्या आहेत.

मध्य रेल्वेतर्फे रविवारी निळजे ते कळंबोली दरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी ४.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ९.५० ते दुपारी १२.५० वाजेपर्यंत ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी यांचे मावळे म्हणून निवडणुकीला सामोरे जा

News Desk

एलफिस्टन आणि करी रोड पुल फेब्रुवारी महिन्यात खुला

swarit

बापमाणूस’च्या सेटवर रंगपंचमी

News Desk