नवी दिल्ली | राजस्थान जयपूरमधील किशनपुरा येथील मतदान केंद्रात १०५ वर्षीय महिलेने आपले मत नोंदविले आहे. शाज असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. दरम्यान, शाज यांच्या कुटुंबीयांनी या मतदान केंद्रावरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अपुऱ्या सोयीसुविधांबाबत निराशा व्यक्त केली आहे. शाज यांचे कुटुंबीय म्हणतात, “या मतदान केंद्रात व्हील चेअरची सुविधा उपलब्ध नाही. आम्हाला शाज यांना मतदान केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्या आपले मत नोंदवू देऊ शकतील.” त्याचप्रमाणे ९७ वर्षीय नागेन्द्र सिंह चौहान यांनी आपली ८५ वर्षीय पत्नी युवराज कुवार हिच्यासह झळवार येथील मतदान केंद्रात मतदान केले आहे.
Shajha, a 105-year-old woman casts her vote at a polling booth in Kishanpura, Jaipur. Family says,"There is no facility of wheel chair in this polling booth. We had to carry her inside the polling station so that she could vote." #RajasthanElections2018 pic.twitter.com/WnVkaEfuQB
— ANI (@ANI) December 7, 2018
Rajasthan: 97-year-old Nagender Singh Chouhan and his 85-year-old wife Yuvraj Kuwar cast their votes at a polling station in Jhalawar. #RajasthanElections2018 pic.twitter.com/omyvnWauMS
— ANI (@ANI) December 7, 2018
राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज (७ डिसेंबर) सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत राजस्थानमध्ये २२ टक्के तर तेलंगणामामध्ये २३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राजस्थानात १९९ आणि तेलंगणामध्ये ११९ विधानसभेच्या जागांसाठी मतदान सुरु आहे. दरम्यान, राजस्थानात ४ कोटी ७४ लाख तर तेलंगणामध्ये २.८० कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.