HW News Marathi
मुंबई

मशीद बंदर स्थानकाच्या पुल दुरुस्तीच्या कामासाठी ६ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वेच्या मशीद बंदर स्थानकातील पादचारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या रविवारी ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या वेळेत मशीद बंदर स्थानक येथील मध्य आणि हार्बर अशा दोन्ही मार्गावरील धीमी लोकल सेवा सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. लोकल प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावरील रेल्वे जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेची धिम्या गतीची लोकल वाहतूक भायखळा तर हार्बर रेल्वेची धिम्या गतीची लोकल वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच सुरू राहील. या व्यतिरिक्त या रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे पूल दुरुस्तीचे महत्त्व लक्षात घेऊन प्रवाशांनी मध्य रेल्वेला सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर देखील शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० या ४ तासांच्या वेळात वसई रोड व विरार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रविवारी पश्चिम रेल्वेवर आणखी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापौरांचा अरेरावीपणा, महिलेचा हात मुरगळत केली दमदाटी

News Desk

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk

सर्व शिक्षा अभियान प्रवेश प्रक्रियेत बदल, गरजवंताना मिळणार न्याय

News Desk