HW News Marathi
मुंबई

रोटरी क्लबचा “लहान बालक हृद्यरोग शस्त्रक्रिया प्रकल्प’ कौतुकास्पद

मुंबई | रोटरी क्लब तर्फे ’टचिंग लिटील हार्ट्स’ हा प्रकल्प राबविण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत विविध इस्पितळांतून लहान बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यास मदत केली जाते. रोटरी क्लबच्या या प्रकल्पांतर्गत कोकिळाबेन धीरुभाई अंबानी इस्पितळामध्ये देखील काही बालकांवर हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. रोटरी क्लब समाजाप्रति जोपासत असलेल्या या बांधिलकीचे कौतुक करण्यासाठी कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालय येथे नुकत्याच एका कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयच्या अध्यक्षा टीना अंबानी, रोटरी क्लबचे पदाधिकारी अशोक महाजन, शशिकुमार शर्मा, बाळ इनामदार, रुग्णालयातील बालक हृदय केंद्राचे डॉ. सुरेश राव व डॉ. स्नेहल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

२०१२ साली रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. बाळ इनामदार आणि डॉ. सुरेश राव यांनी ‘लहान बालक हृद्यरोग शस्त्रक्रिया प्रकल्प’ सुरु केला. गेल्या ६ वर्षांत १००० हून अधिक बालकांवर हृदयरोग शस्त्रक्रिया आतापर्यंत येथे करण्यात आल्या आहेत. कोकिळाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयाच्या या बालहृदयरोग विभागात ३० निष्णात आरोग्य कर्माचारॊ आणि तांत्रिक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. १०५ हून अधिक निष्णात परिचारिका येथे २४ तास दक्ष असतात. देशातील हे एक सर्वांत मोठे बाल हृदय रोगांपैकी एक आहे.

“ही लहान मुलं आपल्या देशाचं आजचं वैभव आणि उद्याचं भविष्य आहे. मात्र काही दुर्दैवी कळ्यांना फुलण्याआधीच हृदयरोगासारख्या विकारांना सामोरे जावे लागते. भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीच्या अभावी या मुलांना उपचार घेणे शक्य होत नाही. अशा मुलांना शोधून त्यांच्यापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याचं महत्कार्य रोटरी क्लब करत आहे. त्यांच्या या कार्यात कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालय नेहमीच सोबत आहे.” अशा शब्दांत टीना अंबानी यांनी रोटरी क्लबच्या कार्याचा गौरव केला. यावेळी कोकिळाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयाचे आभार मानत रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शशिकुमार शर्मा म्हणाले, “ गेल्या ४ महिन्यांत आम्ही ९९ बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया पूर्ण करु शकलो. वर्षाला किमान ५०० बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करण्याचं आमचं उद्दीष्ट आहे. मात्र कोकिळाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालय प्रशासन आणि या बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी प्रायोजकत्व देणाऱ्या विविध व्यक्तींमुळेच हे शक्य झाले आहे. भविष्यात देखील रोटरी क्लब हे कार्य आणखी जोमाने करेल” असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये टी.एन. सुब्रमणिअन, लता सुब्रायडू, गोपाळ मंधनिया, प्रफुल्ल शर्मा, प्रफुल्ल शर्मा, हरजित तलवार, सुनिल मेहरा आदींचा समावेश होता. तसेच परिचारिका, बालकांचे पालक आदींनी या कार्यक्रमास गर्दी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चर्चच्या महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे

News Desk

बीआरटी टेंडरमध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप ; मनसेचा आरोप

News Desk

शेंडकरांची प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखी संकल्पना

News Desk