नवी दिल्ली | नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा सरकारचा क्रूर निर्णय असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला आहे, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ‘ऑफ काउंसिल: द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी’ या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला आहे.
My book #OfCounsel reflecting on my time as Chief Economic Adviser (CEA) will be out next week (https://t.co/XN7f4I5IUa) Contents incl: GST, demonetization, RBI & Govt., banking challenges, stigmatized capitalism. This thread might pique your interest (& open your wallet?) 1/
— Arvind Subramanian (@arvindsubraman) November 28, 2018
‘५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला होता. त्यामुळं आर्थिक विकासदर आठ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांच्या निचांकीवर पोहोचला. एकाच झटक्यात ८६ टक्के चलन हे कागदाचे तुकडे झाले. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला’, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. अरविंद सुब्रमण्यन हे नोटाबंदीच्या वेळी मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.
सुब्रमण्यन यांच्या दाव्याचा आधार घेत काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, माजी मुख्य आर्थिक सल्लागारांनी अखेर नोटाबंदीमागील सत्य उघड केले आहे, असे म्हणत विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.