HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : विधेयक न्यायालयात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करू !

मुंबई | “जर मराठा समाजच्या आरक्षणाच्या विधेयकाला न्यायालयात आव्हान दिले गेले तर हे आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाईल”, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आहे. मराठा आरक्षण विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले असले तरीही हे आरक्षण न्यायालयात टिकू शकेल का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

“आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी सरकारने योग्य ती दक्षता घेतली आहे. सरकारकडून गरज पडली तर न्यायालयात कॅव्हिएट दाखल केली जाईल,” असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा एटीआर आज विधानसभा आणि विधानपरिषदेत सादर करण्यात आला आहे. मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचा उडता प्रचार

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महविकासआघाडी सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna

अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही?

News Desk
राजकारण

येडियुरप्पा-डी. शिवकुमार यांच्या भेटीने कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चेला उधाण

News Desk

बंगळूर | राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. राजकीय पक्ष आवश्यकतेनुसार आपापल्या परिभाषा तयार करत असतात. कारण कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.सी. येडियुरप्पा यांनी काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. शिवकुमार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. भेटी दरम्यान येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय.राघवेंद्रही उपस्थित होते. या भेटीमुळे कर्नाटकात राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या भेटीमुळे शिवकुमार भाजपमध्ये प्रवेश करणार ? कर्नाटकात सत्ता बदल होणार ? अशा अनेक शक्यता वर्तविल्या जात आहेत. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवामोगामधील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे, असे येडियुरप्पा यांनी या बैठकीनंतर सांगितले आहे.

सिंचन प्रकल्पासाठी आपण दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली असून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, असे राघवेंद्र यांनी सांगितले. वन खाते, सिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाले. त्यामुळे राजकीय चर्चेचा प्रश्नच येत नाही, असे येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय.राघवेंद्र म्हणाले आहेत.

Related posts

“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर लोकसभेत खडाजंगी

Aprna

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा DJ च्या तालावर ‘धांगडधिंगा’!; कोरोना नियमांना हरताळ

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांनो, तुमच्या नसानसांत देशप्रेम आहे कि नाही ?

News Desk