HW News Marathi
राजकारण

#MarathReservation : मी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीसाठी गेलेच नव्हते !

मुंबई | मराठा आरक्षणाचा एटीआर आज विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. विधानभवनात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या होत्या. मात्र, पंकजा मुंडे यांनी या बैठकीतून तडकाफडकी निघून गेल्या. पंकजा मुंडे उपसमितीच्या या बैठकीत काही प्रश्न मांडत होत्या. मात्र अचानक नाराज होऊन त्यांनी बैठक सोडून जाण्यासाठी निघाल्या. चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी पंकजा मुंडे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी पंकजा मुंडे यांनी आता यावर वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. “मी या समितीची सदस्यच नव्हते आणि मी या बैठकीसाठी गेलेच नव्हते”, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. “मी नाराज होऊन या बैठकीतून निघाले असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे”, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेकडून अंबादास दानवेंनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी केला अर्ज दाखल

Aprna

पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजयी रॅली काढू देणार नाही !

News Desk

“जेव्हा आपण सत्तेत होतात…” केसरकरांचा उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहाणीवर टोला

Aprna