HW News Marathi
राजकारण

RamMandir : नीलम गोऱ्हेंचे पुण्यातून श्रीरामांना साकडे

पुणे | अयोध्येत राम मंदिर लवकरात लवकर बांधले जावे यासाठी तमाम हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहे. तर जे शिवसैनिक अय़ोध्येला जाऊ शकले नाहीत त्यांनी ते आहेत त्या ठिकाणाहूनच जमेल तसा पाठींबा दर्शविला आहे. आमदार नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी पुण्यातील तुळशीबागेतील राम मंदिरात आरती केली. विशेष म्हणजे राम मंदिर लवकर होऊ दे अशी प्रार्थना करत श्रीराम लिहीलेल्या पेढ्यांचा प्रसादही वाटला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या परिवारासोबत २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत असणार आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरात शिवसैनिक विविध राम मंदिरांमध्ये आरती करणार आहेत. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, काही लोक विचारतात की इतर प्रश्न असताना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा का उचलून धरताय, त्यांच्यासाठी मला सांगायचंय की वचनपूर्ती नावाची गोष्ट असते. १९९२ च्या पूर्वीपासून राम मंदिरासाठीचा लढा सुरु आहे. या मंदिरासाठी दोन पिढ्यांनी मेहनत केली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार असुनही राम मंदिराचा मुद्दा अद्याप अपुरा राहिला आहे. म्हणून तो पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा अशी आमची मागणी आहे. याची जाणीव सरकारला करुन देण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

एका बापाचे असाल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा! – संजय राऊत

Aprna

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

News Desk