HW News Marathi
राजकारण

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे १३ उमेदवार

भोपाळ | मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रिपब्लिकन पक्षाने १३ उमेदवार उतरविले असून अन्य २१७ जागांवर रिपाइंचा भाजपला पाठिंबा असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भोपाळ येथे केली. भोपाळ येथे आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते.

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा असून त्यापैकी २१७ जागांवर रिपाइं ने भाजपला पाठिंबा दिला आहे. १३ जागांवर रिपाइं चे उमेदवार निवडणूक लढत आहेत. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचे काम चांगले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याही देशभरातील विकासाच्या कामांचा करिष्मा मध्यप्रदेशात चालणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात भाजप रिपाइं बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपाइं कार्यकर्त्यांनी भाजप रिपाइं उमेदवारांना विजयी करण्यासाठी जोमाने प्रचाराला लागण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सरकारमध्ये जे खुर्चांना फेविकॉल लावून बसलेत”, संजय राऊतांची टीका

Aprna

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

Manasi Devkar

भाजपने मित्रपक्षांना जागा ‘दाखवली’ म्हणजे ‘दिली’, उद्धव ठाकरेंचा टोला

News Desk