HW News Marathi
राजकारण

माझे वक्तव्य काँग्रेस विरोधात, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही !

नवी दिल्ली | ‘माझे वक्तव्य हे काँग्रेसविरोधात, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही. तरीही मी माफी मागतो’, या शब्दात आम आदमी पक्षाचे नेते आमदार एच.एस.फुल्का यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. अमृतसर जिल्ह्यातील आदिलावाल गावात काल (रविवार) दुपारी अज्ञान हल्लेखोरांनी निरंकारी भवनमध्ये ग्रेनेड फेकून हा स्फोट घडवून आणला. लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा या हल्ल्यामागे हात असल्याचा संशय आम एच.एस.फुल्का यांनी व्यक्त केला आहे. फुल्का यांच्या या वादग्रस्त विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनआयएची तुकडी या हल्ल्याचा तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंग यांनी हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्याला तब्बल ५० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.

हे होते एच.एस.फुल्का यांचे वक्तव्य

‘लष्करप्रमुख बिपिन रावत पंजाबमध्ये आले होते. कदाचित त्यांचे भाकित चुकीचं ठरू नये म्हणून त्यांनीच आपल्या माणसांचा वापर करुन हा हल्ला घडवून आणला असेल’, असा गंभीर आरोप फुल्का यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची मागणी

News Desk

‘एमआयएम’च्या स्वबळाच्या निर्णयाचे आठवलेंकडून स्वागत

News Desk

काही आमदारांना आमिष दाखविण्यास सुरुवात झालेली आहे !

News Desk