HW News Marathi
देश / विदेश

अमृतसरच्या निरंकारी भवनमध्ये ग्रेनेड स्फोट

नवी दिल्ली | अमृतसर जिल्ह्यातील राजासांसी परिसरातील आदिलावाल गावात रविवारी दुपारी अज्ञान हल्लेखोरांनी निरंकारी भवनमध्ये ग्रेनेड फेकून हा स्फोट घडवून आला. यात स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जणांची प्रकृती चिंताजन आहे. जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते. पंजाबमध्ये गेल्या तीन दिवसापासून हाय अलर्ट जाहीर केला होता. दोन अज्ञान दुचाकी स्वारांनी हा हल्ला घडवून आणला

या निरंकारी भवनामध्ये दर रविवारी सत्संगाचे आयोजन करण्यात येते. यावेळी दोन अज्ञान ग्रेनेड स्फोट केला. या स्फोटानंतर घटनास्थळी गोंधळ माजला. स्फोट झाल्याची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस हल्ले खोरांचा शोध सुरू असल्याची माहिती आयजी (सरहद्द) सुरिंदर सिंह परमार यांनी दिली.

जम्‍मू-काश्‍मीरमधील दहशतवादी संघटनेचा म्‍होरक्या झाकीर मूसा अमृतसरमध्ये दिसल्यानंतर पंजाबात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जैश-ए-मोहम्मदचे सात दहशतवादी घुसल्याची धक्कादायक माहिती पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. पंजाब पोलिसांच्या गुप्‍तचर विभागानेही गुरुवारी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जैशचे दहशतवादी भारतात दाखल झाले असून ते राजधानी दिल्‍लीकडे कूच करत आहेत. ६ ते ७ दहशतवादी असून ते फिरोजपूरहून दिल्‍लीकडे जात असल्याची माहिती मिळाली होती.

याआधी पठाणकोटच्या माधोपूर भागात चार संशयितांनी १४ नोव्हेंबरला एक एसयूव्ही कार बंदुकीचा धाक दाखवून पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यातच आता दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली असून संपूर्ण राज्यातील पोलीस दलाला सतर्कतेचा इशारा देण्याचा आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीश कुमार- मोदींचा तिनशे कोटींचा घोटाळा

News Desk

केरळमध्ये दारू पिऊन प्रवासावरही बंदी!

News Desk

सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Aprna