नवी दिल्ली । केरळमधील शबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. या वादात आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी उडी घेतली असून त्यांनी १७ नोव्हेंबरला तृप्ती देसाई यांनी मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना तृप्ती देसाई यांनी पत्र पाठविले असून, या पत्रात त्यांनी सुरक्षेची मागणी देखील केली आहे. परंतु देसाई यांच्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मुख्यमंत्र्यांनी दिले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
I have not received any response from the Kerala government. If any incident occurs, its responsibility will be on Kerala CM and DGP: Trupti Desai, founder of the Bhumata Brigade. She had written to Kerala CM seeking security for her visit to #SabrimalaTemple on 17 November pic.twitter.com/lB54OeU7AS
— ANI (@ANI) November 15, 2018
तृप्ती देसाई यांनी याविषयी बोलताना सांगितले की, केरळ सरकारकडून माझ्याकडे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणतीही अनुचित प्रकार घडला, तर त्याला मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक जबाबदार असतील.
आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता.
या निकालाच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पुकारला. या बंद दरम्यान अनेक हिंसक घटना देखील घडल्याने राज्य सरकारने जमाव बंदी लागू केली होती. तसेच, काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. दाखल करण्यात आलेल्या या पुनर्विचार याचिकांवर २२ जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.