पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे गेले अनेक दिवस त्यांना राजकारणात फार वेळ देता येत नव्हता. यावरून विविध प्रकारच्या चर्चांना आणि टीकांना उधाण आले होते. मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत होती. मात्र मनोहर पर्रिकर यांनी आज सकाळी आपल्या घरीच कॅबिनेटची बैठक बोलवली आहे. विजय सरदेसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे.दरम्यान, मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग (पॅनक्रिएटिक कॅन्सर ) झाल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तीनच दिवसांपूर्वी दिली आहे.
Goa CM Manohar Parrikar has called a cabinet meeting at his residence tomorrow. This goes to prove that the CM is working and is committed towards good governance: Goa Minister Vijay Sardesai in Panaji pic.twitter.com/vJvTiqBlAC
— ANI (@ANI) October 30, 2018
“मनोहर पर्रिकर यांचा सुशासनावर विश्वास असल्याने ते काम करण्यासाठी उत्सुक आहेत,” असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे गेले अनेक दिवस राजकारणात सक्रिय नसलेल्या पर्रिकरांबद्दल काँग्रेस नेते जितेंद्र देशप्रभू यांनी अत्यंत वादग्रस्त असे विधान केले होते. “पर्रिकर जर जिवंत असतील तर ते सत्ताधारी भाजपने गोव्याच्या लोकांसमोर सिद्ध करुन दाखवावे. खासगी किंवा सार्वजनिकरित्या ते कोठेही दिसून येत नाहीत. तुमच्याकडे जर मुख्यमंत्री नाहीत तर मग त्यांचे श्राद्ध घाला,” असे वादग्रस्त विधान जितेंद्र देशप्रभू यांनी केले होते.
मध्यंतरी गोव्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून भाजप व सत्ताधारी आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या पर्यायी व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली होती. या पर्यायी मुख्यमंत्रीपदासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव देखील सुचविले जात होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.