HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांनी का फिरवली पाठ ?

मुंबई | अमृता फडणवीस यांचा क्रुझवर काढलेला वादग्रस्त सेल्फी सोशल मिडीयावर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. या सेल्फीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेल्फीसाठी नसते धाडस केल्याचे समोर आले आहे. शनिवार २० ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई-गोवा क्रूझ सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढण्याचा मोह अमृता यांना आवरता आला नाही. त्यांच्या या वादग्रस्त सेल्फीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची काय प्रतिक्रीया असेल किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणाची काहीच कल्पाना नसेल का असा सवालही अनेकांनी उपस्थित केला. तसेच अमृता यांच्या या सेल्फीनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना बायकोकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला देखील अनेकांनी दिला आहे.

परंतु सदर सेल्फीच्या वेळी अमृता फडणवीस सेल्फी घेत असताना मुख्यमंत्री फडणवीस पाठ फिरवून उभे असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अमृता फडणवीस जेव्हा धोकादायक जागेवर बसून सेल्फी घेत होत्या तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी देखील उपस्थित असल्याचे पहायला मिळत आहे. दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री सदर ठिकाणी उपस्थित होते तरीही त्यांनी या सेल्फी प्रकरणाला विरोध का केला नाही. हा प्रश्न पेच निर्माण करणारा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात! – राधाकृष्ण विखे-पाटील

Aprna

वरळीत संरक्षक भिंत बांधण्यासाठी २.५० कोटींचा निधी मंजूर

News Desk

महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे एकटे; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna
महाराष्ट्र

शरद पवार सत्तेत असताना आरक्षणांच्या मुद्यावर कधीच भाष्य केले नाही

News Desk

मुंबई | ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केंद्र आणि राज्यात सत्ता होती. तेव्हा पवारांनी आरक्षणांच्या मुद्दावर कधीच भाष्य केले नाही. पण, सत्तेत नसताना वारंवार आरक्षणाच्या मुद्यावर शरद पावर बोलत आहेत,’ अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

तसेच ‘काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मोदीना गेल्या चार वर्षात काय केले असा सवाल विचारात आहेत. पण, राहुल गांधी तुम्ही मला सांगा की, काँग्रेस पक्ष गेल्या चार दशकापासून सत्तेत होते. मग, चार दशकात तुमच्या सरकारने काय केले ते आधी सांगात असा उलट सवाल,’ करत अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी केला आहे.

जेव्हा वादळ येते तेव्हा सर्व प्राणी एकत्र येतात. आणि या वादळाचा सामना करतात. तसेच मोदी ही लाट राहिली नसून वादळ झाले आहे. त्यामुळे मोदी रुपी वादळ विरोधात प्राणी म्हणजे विरोधक एकत्र येणार असल्याचे अमित शहा यांनी विरोधकांवर टीका करुन खरपूस समाचार घेतला आहे. हा भाजपचा सुवर्ण काळा असल्याचे सर्वांना वाटते. पण, २०१९ची निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा बहुमताने निवडून दिल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपचा सुवर्ण काळाला सुरुवात होणार आहे.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामेळावा वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातील भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा करताना विरोधकांवर टीकेची झोड उटवली.

Related posts

विधानपरिषदेत राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला अर्थसंकल्प

Aprna

आज दहावीचा निकाल, बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता पहा

News Desk

केंद्राकडून आरोग्यविभागाला पीपीई किट्स, आणि व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार

News Desk