पुणे | भूमाता ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई या केरळच्या शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल जाब विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी शिर्डीच्या दिशेने रवाना होण्यासाठी निघाल्या होत्या. परंतु पुणे पोलिसांनी त्यांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेतले. मोदी हे आज (१९ ऑक्टोबर)ला साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी शिर्डीला भेट देणार आहेत.
Police force was already here today morning when we were about to leave for Shirdi. It is wrong. It is our Constitutional right to protest. We are being stopped at home only. It is an attempt to suppress our voice through Modi ji: Activist Trupti Desai on being detained by police pic.twitter.com/n8NJXBhqGR
— ANI (@ANI) October 19, 2018
देसाई यांना ताब्यात घेताना त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. “संविधानाने आंदोलन करणे आणि निषेध करण्याचा हक्क” दिला आहे. परंतु सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देसाई यांनी यावेळी केला आहे. शबरीमाला येथील अय्यपा मंदिरात प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना मारहाण केली जाते. महिलांवर हात उचलणाऱ्यांवर कारई का केली जात नाही, असा सवाल यावेळी देसाई यांनी उपस्थित केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महिला मंदिरात का जाऊ शकत नाही? या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प का बसले? महिलांसाठी अच्छे दिन कधी येणार? असे अनेक सवाल देसाई यांनी प्रसार माध्यांशी बोलताना सरकारला विचारले आहेत.
तृप्ती देसाई यांनी काल (१८ ऑक्टोबर)ला अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते. “मोदींची भेट न घेऊन दिल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा” तृप्ती देसाई यांनी पत्रात म्हटले होते. पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे पोलिसांना यांची माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे. यानंतर देसाई यांना घराजवळूनच पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.