HW News Marathi
देश / विदेश

पारंपरिक सोने खरेदीला छेद, ऑनलाइन बाजारात सोन्याला झळाळी

मुंबई | साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या निमित्ताने भारतात पारंपारिक सोने खरेदीची परंपरा आहे. मात्र या प्रतिमेला छेद देत ग्राहकांकडून ऑनलाइन बाजारात सोने खरेदीसाठी पसंती दिली जात आहे. केवळ काही दिवसांत १ लाखांहून अधिक लोकांनी ऑगमाँट या appव्दारे लाखों रुपयांचे सोने खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.

भारतात सणासुद्दीला तसेच अस्थिर, अश्वाश्वत स्थितीत ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदी खरेदीकडे कल असतो. रुपयांच्या घसरणीनंतर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दसऱ्यापूर्वी ग्राहकांनी ऑनलाइन बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरूवात केल्याचे ऑगमाँटचे संचालक सचिन कोठारी यांनी सांगितले.

सर्वसामान्य ग्राहकांकडून १ ते ५ ग्रँम पर्यंतच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असून लवकरच पेटीएम app च्या माध्यामातून ग्राहकांना नाणी तसेच दागिने खरेदी करता येणार असल्याचे कोठारी म्हणाले.

सध्या जगण्याला आलेला वेग पाहता ग्राहकांना घरबसल्या एका क्लिकवर अगदी ०.१ ग्रँमपासून ते किलोपर्यंत ऑगमाँट app व्दारे सोने-चांदी करता येत आहे. यात त्यांना अगदी मोबाइलवरून सोन-चांदी खरेदी ग्राहक करता येत आहे. यामुळे ग्राहकांकडून डिजिटल पर्यायाला पसंती दिली जात आहे. वेळेची बचत तसेच अनेक घरबसल्या पाहता येत असल्याने ग्राहकांना उत्तम पर्याय असल्याचे स्नेहल सोहनी यांनी सांगितले.

अशा प्रकारच्या appव्दारे ग्राहकांना सोने-चांदी खरेदीच्या पर्यायाबरोबर विक्रीचाही पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. पारंपारिक बाजाराप्रमाणेच पोहेहार, मोहनमाळ, गोफ, बांगड्या, पाटल्या, शाहीहार, गोठ आदी दागिन्यांची फँशन पुन्हा एकदा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती रामनाथ कोविंदही करणार कोरोनाची चाचणी

swarit

आधुनिक’ जीवनशैलीमुळे घटतेय शुक्राणूंची संख्या

News Desk

अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर

swarit