HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

संध्या चौगुले यांचा अनोखा प्रवास, १८ वर्षात ६० हजाराहून अधिक वृक्षारोपण

सातारच्या संध्या पांडुरंग चौगुले यांनी गेल्या काही वर्षांपासून लावलेल्या झाडांची संख्या ऐकली तर आवाक व्हायला होते. संध्या चौगुले यांनी सातारा शहरासह ग्रामीण भागातही विविध प्रकारची ६० हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. संध्या यांचे शिक्षण एम.एस्सी. बी.एड. पर्यंत झाले आहे. संध्या सद्या एका महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहे. हे सर्व करताना संध्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे.

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन

निसर्गातील झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन १९८६ सालापासुन मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष वृक्षारोपणाचे काम करत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून बोटॅनिकल गार्डन्स विकसित करून जैवविविधता जतन करण्याचे काम सुरू आहे . रिकाम्या सुरक्षित जागा आणि वृक्षप्रेमी व्यक्ती, संस्था शोधून झाडे लावली व जगविली जातात. दरवर्षी ५ ते ६ हजार रोपांचे विनामूल्य वाटप करून पावसाळाभर वनमहोत्सव साजरा केला जातो. आजवर डोंगर ,देवराया, दुतर्फा रस्ते, कार्यालये , पडीक जागा , शाळा महाविद्यालये आणि ग्रामपंचायती मधून ५०,००० हून अधिक वृक्ष जतन केले आहेत .

मानवनिर्मित जंगल हिरवाई प्रकल्प

२००४ साली सदर बाजार येथील झोपडपट्ट्या लगत रस्त्याकडेच्या ३ एकर पडीक व दुर्गंधीयुक्त कचरा पट्टीवर विविध प्रकारची ३ हजार झाडे लावून हिरवाई प्रकल्प उभा केला आहे. यामध्ये शाळा कॉलेजमधील विद्यार्थी , कातकरी आणि अनेक गावांचे श्रमदानातून योगदान लाभले .

गेली १२ वर्षे हिरवाईमध्ये दरवर्षी झोपडपट्टीतल्या आणि आदिवासी कातकरी मुलांना, महाविद्यालयातील युवक युवतींना सोबत घेऊन एकत्रित अशी राखी पौर्णिमा, रोपे लावून दसरा, वडाची झाडे लावून वटपौर्णिमा तसेच शाळेची आवड लागावी म्हणून शैक्षणिक साहित्य भेटी देऊन कातकरी मुलांची दिवाळी हे उपक्रम साजरे होतात .

बिनभिंतीची शाळा

२००५ पासून उपेक्षित वर्ग झोपडपट्ट्या आणि कष्टकरी कुटुंबांतील मुलामुलींसाठी दररोज हिरवाईमध्ये ही अनौपचारिक शाळा सुरू आहे . ६० मुले या झाडाखालच्या शाळेचा लाभ घेतात साताऱ्यातील अनेक सेवाभावी लोक त्यांना शिकवण्यासाठी येतात बिनभिंतीच्या शाळेत वाचनालय, खेळाचे साहित्य उपलब्ध केले आहे . या मुलांना बरोबर घेऊन त्यांच्या परिसरातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन दरवर्षी झोपडपट्ट्यांतील ८ ते १० मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले जाते . ( गेल्या दिड वर्षा पासून हा प्रकल्प बंद आहे. तो लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल . )

पर्यावरण जागर

सभोवतालच्या पर्यावरणाविषयी सर्वांच्या मनामध्ये कुतूहल , आस्था निर्माण करून त्याच्या संरक्षणासाठी सजगता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातात. यामध्ये प्रामुख्याने हिरवाई निसर्ग प्रदर्शन, निसर्गसहली आणि शाळा महाविद्यालयांबरोबरच ग्रामीण भागातून व्याख्याने यांचा समावेश असतो.

हिरवाई निसर्ग प्रदर्शन

दरवर्षी हिरवाईच्या निसर्ग सानिध्यात ३ एकरांमध्ये हे प्रदर्शन भरवले जाते यामध्ये वेगवेगळ्या पर्यावरणीय प्रकल्पांमधून निसर्ग जाणून घेता येईल अशी सखोल माहिती विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते .

ग्रामविकास आणि निर्मल ग्राम

ग्राम सुधारणेसाठी संपूर्ण जिल्हाभर प्रबोधन केले. सन २००० पासून संत गाडगेबाबा अभियानाच्या माध्यमातून ११ गावांमधून स्वबळावर दीर्घकाळ प्रत्यक्ष काम केले आहे. यातील प्रत्येक गावाने तालुका, जिल्हा, विभाग अथवा राज्यस्तरावर आपला विकास साधला . सर्वच गावे निर्मल झाली. तंटामुक्त झाली. तेथील प्रत्येक बाई बचत गटात सामील झाली . यामध्ये प्रामुख्याने दुर्गळवाडी बेबले वाडी इंगळे वाडी हनुमानवाडी, ठोमरेवाडी, अनपटवाडी, उंबरी ,लोधवडे या गावांचा समावेश आहे .

महिला सबलीकरण

खेड्यातून काम करताना तेथील प्रत्येक बाईला ग्राम सुधारणेच्या सर्व उपक्रमांमध्ये सामील करून घेतले. त्यातून मिळवलेल्या सहभागातून ६५ गावांमध्ये दोनशेहून अधिक बचतगट स्थापन केले . शेळीपालन, म्हैशीपालन, फूल उत्पादन अशा शेतीला पूरक उद्योगातून स्वतःचे असे अर्थार्जन झाल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढली आणि अशा अनेक स्त्रियांच्या सहभागातून गावांमध्ये टिकाऊ, शाश्वत स्वरूपाचे परिवर्तन झाले .

आदिवासी कातकरी वस्तीचा स्वयंरोजगारातून विकास

सन २००१ पासून सातारा शहराजवळच्या कातकरी वस्तीमध्ये सातत्याने काम करत आहे . साधारणपणे ४०० लोकसंख्येच्या या वस्तीमध्ये प्रामुख्याने एन . एस . एस. कॅम्प व सलग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता , आरोग्य, शिक्षण आणि उदरनिर्वाहाची साधने याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती केली. गोवर, कुपोषण यामुळे होणारे बालमृत्यू आटोक्यात आणले . तेथील महिलांच्या सहभागाने व्यसने, जुगार कमी करून तीन बचत गट स्थापन केले शिक्षणाचा गंध नसलेल्या या वस्तीतील मुले आता शाळेत जाऊ लागली आहेत .

जलसंधारण

सोनके, वेळे कामठी , आकले, इंगळेवाडी या गावातून लोकांना बरोबर घेऊन एन एस एस च्या सहकार्याने अनेक वनराई बंधारे बांधले त्यातून पडीक जिरायती शेती ओलिताखाली आल्याने आपोआपच लोकजागृती झाली.

पाणलोट विकास

शासनाच्या वसुंधरा पाणलोट विकास योजनेमध्ये सहभागी होऊन ६५ गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकसित करण्यामध्ये ग्रामस्थांसाठी प्रशिक्षणे , जाणीव जागृती मेळावे व अभ्यास सहलींचे नियोजन केले . सातारा, वाई , माण, कोरेगाव, फलटण तालुक्यांमधून हे काम करताना या सर्व गावातून झाडे लावून त्यांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा केला व यातून हजारो झाडे लावली .

ई कचरा जनजागृती

यामध्ये सातारा जिल्ह्यातील पस्तीस शाळांना सहभागी करून घेतले. त्या शाळेतील शिक्षकांना ई- कचऱ्याविषयी माहिती देण्यासाठी चार कार्यशाळा घेतल्या . या शिक्षकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत ई कचरा व त्याच्या त्याचा आरोग्यावर व पर्यावरणावर होणारा घातक परिणाम याबद्दल जागरुकता निर्माण केली. या शाळांच्या माध्यमातून हजारो टन ई- कचरा गोळा केला .

हिरवाईच्या कविता

खेडोपाड्यातून काम करताना आणि झाडे लावत असताना आलेल्या अनुभवावर हिरवाईच्या कविता नावाचा कविता संग्रह लिहिला आहे . तसेच साधना साप्ताहिकाने माझ्या वरील सर्व कामांसाठी मी खेड कसं बदललं ही मुखपृष्ठकथा केली आहे .

मिळालेले पुरस्कार

१) महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र पुरस्कार . २००४/५

२) महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा वनश्री पुरस्कार.

सन २००५

३) महाराष्ट्र ग्रॅज्युएट फोरमचा महाराष्ट्र युवा भूषण पुरस्कार सन २००८

४) सर्प संरक्षक संस्था, सातारा यांचा राज्यस्तरीय पुरस्कार

सन २००८/९

५) मराठी साहित्य संघ कोडोली त्यांचा गौरव पुरस्कार .

६) पोलाद उपक्रम अंतर्गत सातारा आयकॉन पुरस्कार .

सन २०१०

७) अश्वमेध प्रतिष्ठान, सातारा चा साहित्य पुरस्कार सन २०११

८)निसर्गसेवक संस्था पुणे यांचा निसर्गसेवक पुरस्कार.

सन २०१२

९) डॉ. केशव

हेडगेवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा केशवसृष्टी पुरस्कार .

सन २०१३.

१०) महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार .

सन २०१३.

११) आगाशे ट्रस्टचा लक्ष्मी मोरेश्वर पुरस्कार .

१२) श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर यांचा आनंदी माऊली पुरस्कार .

आणि

१३) यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, महिला मंडळ सातारा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती पुणे, रोट्रॅक्ट क्लब कराड , सखी उद्योगवर्धिनी महिला विकास संस्था सातारा, शिव उदय प्रतिष्ठान, सातारा, अर्जुन चॅरिटेबल फाउंडेशन कोरेगाव, रोटरी क्लब सातारा असे इतर अनेक पुरस्कार .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा तर समस्त महिलावर्गाचा अपमान !

News Desk

आजचा रंग लाल, ‘कालरात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

…म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात

News Desk