HW News Marathi
राजकारण

राफेल विमानावरून पवारांचा युटर्न

बीड | दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत राफेल विमानाच्या किंमती योग्य असून मोदींचा याप्रकरणात व्यक्तीश: संबंध नसल्याचे वक्तव्य केले होते. आज बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या विजय संकल्प मेळाव्याच्या व्यासपीठावर या वक्तव्यावरुन युटर्न घेत पवारांनी राफेल विमानाच्या किंमती वाढल्या कशा ? राफेल व्यवहार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची चौकशी करा? असे म्हटले. त्यामुळे या पवारांच्या वक्तक्यांवरुन राजकीय क्षैत्रात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा बीडमध्ये पहिला विजय संकल्प मेळावा पार पडला. होते. या मेळाव्यात शरद पवारांनी सांगितले की, राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीची माहिती गुप्त का ठेवण्यात आली आहे? सरकार जर या प्रकरणी स्पष्टीकरण देणारच नसेल तर आरोप होणारच त्यामुळेच राफेल विमान खरेदीची माहिती संसदेत देण्यात यावी, राफेलच्या माध्यामातून देशाची लुट झाली असून बोफर्सची चौकशी करा म्हणाणारे भाजप राफेलबाबत गप्प का आहे. तांत्रिक माहिती देऊ नका, मोदी किंमतीची माहिती का देत नाहीत ज्या राफेल विमानाची किंमत 650 कोटी होती त्याची किंमत 1600 कोटीपर्यंत केली. याचा तपास झाला पाहिजे, मी मोदीचे समर्थन केले नसल्याचे पवारांनी सांगितले.

मोदींना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही. पाकिस्तानची मजल वाढली असून 56 इंचाचा छातीला काही करता आले नाही चार वर्षांत शेकडो सैनिक मृत्युमुखी पडले, पाकिस्ताना धडा शिकवण्यासाठी मोदींनी काय केले? अशा सवाल त्यांनी विचारला. सरकारला शेतकर्‍याचे दुखणे दिसेना, धनदांडग्यांनी बँकांचे कर्ज थकवले, पण मोदींनी उद्योग आणि श्रीमंतांची कर्जे माफ केली. पण शेतकर्‍याचे दुःख त्यांना समजत नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा वापर जनतेसाठी नाही. ज्यांच्या हातात राज्याची आणि केंद्रात सत्ता आहे त्यांना हटवायचे आहे. त्यामुळे असे सरकार खाली आणणे हेच आमचे लक्ष्य आहे. या दरवाढीचा परिणाम तुमच्या खिशावर होतो आहे. पेट्रोल डिझेलचे पैसे आधी वाढले नव्हते असे म्हणणार नाही, पण आता दरवाढीचा विक्रम मोडला आहे. महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले असल्याचे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही”, शरद पवारांनी भाजपला टोला लगावला

Aprna

#LokSabhaElections2019 : शिवसेना-भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग !

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही मतभेद आहेत ते सर्व संपवून टाकायचे! – अजित पवार

Aprna