HW News Marathi
देश / विदेश

विना अनुदानित सिलिंडर ५९ रुपयांनी महागले

नवी दिल्ली | दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. त्याचबरोबर सीएनजीसह घरगुती गॅस आणि विमान प्रवासावरही दरवाढीचे सावट पडले आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास ५९ रुपयांनी वाढल्यामुळे ऐन सणासुदीच्या वेळीत सर्वसामान्यांना महागाईचा तडाका बसणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधी सामान्यांचे दिवाळे निघणार आहे. तर दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो ५१.२५ रुपयांनी वाढला. तर नोएडामध्ये ५४.०५ रुपयांनी दर वाढ झाली आहे.

सीएनजीची ही दरवाढ देशभरात आज मध्यरात्रीपासून लागू केले आहेत. सीएनजीची प्रति किलोला ४६ रुपयांच्या आसपास सीएनजी विकला जाणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे सामान्याच्या खिशाला कात्री लागणार आहे. आंतराराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढ आणि रुपयाचे अवमुल्यन होत असल्यामुळे इंधन सतत दरवाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचा जिव मेटाकुटीला आला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९१.०८ डिझेल ७९.७२ असे प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर सीएनजीचे ४४.२२ च्या जवळपास पोहचले आहेत. सरकारने विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५९ रुपयांची वाढ केली आहे. तर अनुदानित सिलिंडमध्ये २.८९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समितीचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात सादर होणार

News Desk

#PulwamaAttack : केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षाविषयक बैठक सुरु

News Desk

‘५४ कारखान्यांचीही चौकशी झाली पाहिजे’, चंद्रकांत पाटील अमित शहांना लिहिणार पत्र

News Desk