HW News Marathi
क्रीडा

फुटबॉलपटू रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप

ब्राझिल | पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर एका महिलेने बलात्काराचा आरोप लावला आहे. महिलेच्या आरोपामुळे रोनाल्डो एका नव्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. रोनाल्डोने जून २००९ मध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. एका जर्मन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने हा आरोप केला आहे.

दरम्यान रोनाल्डोच्या वकिलाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून मासिकावर व त्या महिलेवर नुकसान भरपाईचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. जून २००९ मध्ये या महिलेवर एका हॉटेलच्या खोलीत रोनाल्डोने बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तिला याविषयी कुणाला सांगितलेस तर तुझ्यावर नुकसान भरपाईचा दावा ठोकू असे सांगितले होते. तसेच तिला तोंड बंद ठेवण्यासाठी तब्बल ७० लाख रुपये दिले होते. असे त्या महिलेने त्या जर्मन मासिकाला सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

क्रिकेटर आयुष झिमरेने घेतली आठवलेंची भेट

News Desk

रोहित शर्मासह ५ क्रीडापटूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर 

News Desk

Ind Vs Pak : भारत पाक पुन्हा एकदा आमने-सामने

swarit
देश / विदेश

विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस अपयशी | नरेंद्र मोदी  

swarit

नवी दिल्ली । मोदींनी नमोऍपवरून भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्या विविध प्रश्‍नांचीही उत्तरे दिली. यावेळी त्यांनी एकप्रकारे नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले आहे. नोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब झाला आहे. प्रॉपर्टींचे दर खाली आले आहेत. यूपीएच्या राजवटीत गृहकर्जावरील व्याजदर दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होता. तोही आता कमी झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले. कार्यकर्त्यांबरोबरच्या संवादात त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. मागील चार वर्षांत कॉंग्रेसचा जनतेबरोबरचा संबंध तुटला आहे. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सपशेल अपयशी ठरला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटे आरोप करणे आणि बनावट बातम्या पसरवणे हा त्या पक्षाचा एकमेव अजेंडा बनला आहे.

मीडियाच्या विविध स्वरुपांचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचावे. त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडून कॉंग्रेसच्या खोट्या आरोपांवर आधारित प्रचाराला प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन मोदींनी केले. कॉंग्रेसची केंद्रातील राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. कुठलीही व्हिजन (दूरदृष्टी) नसलेले लोक सध्या टेलिव्हिजन (टीव्ही) बनले आहेत. त्या टीव्हीवर सातत्याने कॉमेडी सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला. सबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून आमच्या सरकारने मागील चार वर्षांत सर्व वर्गांच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत केले. मागील राजवटीत जनतेला महागाई भेडसावत होती याची आठवण तुम्हाला असेल. आमच्या कार्यकाळात नक्षलग्रस्त भागांमधील हिंसाचार २० टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सरकारच्या धोरणांमुळे आणि विकासामुळे चार वर्षांच्या कालावधीत सुमारे ३ हजार ५०० नक्षलवादी शरण आले, असेही मोदींनी नमूद केले.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

swarit

सोपोर, बडगावमध्ये दहशतवादी, भारतीय लष्कराची शोध मोहीम

swarit

काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk