HW News Marathi
राजकारण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार आंदोलन ?

राळेगणसिद्धी | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहेत. लोकपाल तसेच कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती दिवशी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा मोदी सरकारला इशारा दिला आहे. राज्यातील भाजपच्या अनेक दिग्गज नेते मंडळींनी यावर तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु अण्णांनी माघार घेणार नसल्याचे सांगितले.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकपाल बाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा अण्णांनी निर्धार केल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढणार यात शंका नाही. येत्या २ ऑक्टोबरपासून अण्णा राळेगणमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, तरी दिल्ली तसेच देशातील अन्य अनेक ठिकाणी अण्णांच्या चाहत्यांनी आंदोलनाची जोरदार तयारी चालविली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज भाजपचे उपोषण

News Desk

अयोध्येनंतर ठाकरेंची पंढरीची वारी

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रम

Gauri Tilekar