HW News Marathi
राजकारण

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक 6 डिसेंबर 2020 पर्यंत उभारले जाणार !

मुंबई | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदूमिलस्थळी येत्या ६डिसेंबर २०२० पर्यंत उभारले जाईल अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली. बांद्रा येथील एम एम आर डी ए कार्यलयात आज रामदास आठवले यांनी इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्यात या स्मारक कामाची प्रमुख जबाबदारी असलेले एम एम आर डी ए चे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे; वास्तुविशारद शशी प्रभू; शिल्पकार राम सुतार; शापुरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापक उमेश साळुंखे; महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे ; एमएमआरडीए च्या सुचेता कदम; देशपांडे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

इंदूमिलस्थळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याची कालमर्यादा फेब्रुवारी २०२१ सालापर्यंत निर्धारित केली असून स्मारकाचे काम वेगवान पद्धतीने होत असून येत्या ६ डिसेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण होऊन त्याचे उदघाटन करण्यात येईल अशी ग्वाही या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंना दिली.

इंदूमिलस्थळी उभारण्यात येणारे स्मारक हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाला साजेसे उभारण्यात यावे. अजरामर ठरणारे या स्मारकाचे काम असून या स्मारकाच्या कामात कोणताही कामचुकारपणा न करता जबाबदारीने काम करण्याची सूचना रामदास आठवलेंनी अधिकाऱ्यांना केली. या स्मारकाचे काम अभ्यासपूर्ण विचारपूर्वक करीत असल्यबद्दलही ना रामदास आठवलेंनी समाधान व्यक्त केले आहे. इंदूमिल मधील स्मारकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा ३५० फुटांचा उभारण्यात येणार आहे. या स्मारकात ग्रंथालय ; इ-लायब्ररी तसेच विपश्यना केंद्र; सभागृह उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे प्रवेशद्वार संचिच्या स्तूपाच्या प्रवेशव्दारासारखे बौद्ध संस्कृती चे प्रतीक म्हणून उभारण्यात यावे तसेच स्मारकात स्तूप उभारण्यात यावा अशी सूचना ना रामदास आठवलेंनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

इंदूमिल स्थळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाच्या प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक सर्व परवानगी मिळविण्यात आल्या आहेत. तेथील झाडे तोडण्याची महापालिकेची परवानगी मिळविण्यात अली असून जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत आहे. समुद्राचे पाणी इंदूमिल मध्ये येऊ नये यासाठी भिंत उभारण्याचेही काम करण्यात येत आहे. इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या स्मारकासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री ना राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत समिती शासनाने नियुक्त केली आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फूट उंच पुतळा उभारण्यात येत असून या पुतळ्याचा चेहरा हुबेहूब महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसत नसल्याबद्दल ना रामदास आठवलेंनी यावेळी नापसंती व्यक्त करीत मुंबईत शिल्पकार वाघ यांनी उभारलेला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहून त्यातीक चेहर्यप्रमाणे पुतळा उभारण्याची सूचना ना रामदास आठवलेंनी केली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फूट उंच पुतळा चीन मध्ये निर्माण करण्यात येणार असून त्याचे पार्ट भारतात आणल्यानंतर येथे ते जोडण्यात येतील आणि त्यांनंतर इंदूमिल मध्ये हा पुतळा उभारण्यात येईल अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांनी यावेळी दिली. यावेळी रिपाइं चे सिद्धार्थ कासारे; सुमीत वजाळे; सचिनभाई मोहिते; हेमंत रणपिसे; प्रवीण मोरे; अमित तांबे;आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते”, गोपीचंद पडळकरांचे जितेंद्र आव्हाडांवर टीका

Aprna

एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ?

News Desk

पद्मावत सिनेमा पाहण्यासाठी वेळ आणि पैसा वाया घालवू नका – ओवीसी

swarit