नवी दिल्ली | विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम 497वर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ गुरुवारी निकाल देणार आहे. या प्रकरणात केंद्रानेही शपथपत्र दाखल केले आहे. व्यभिचार कायदा हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. या कायद्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना न्याय देण्यात भेदभाव करण्यात येत असल्याची अनेकांमध्ये भावना आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय घेणार आहे. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांचा यामध्ये समावेश आहे. घटनापीठ व्यभिचार हा गुन्हा आहे की नाही हे गुरुवारी ठरवणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post