HW News Marathi
महाराष्ट्र

आजचा सुजाण बालक उद्याचा आदर्श नागरिक | अशोक बनकर

सांगली | आजचा सुजाण बालक उद्याचा आदर्श नागरिक असे प्रतिपादन डोर्ली ता. तासगाव येथे सामाजिक कार्यकर्ते पंढरी आबा मोरे व बसव ग्रुप डोर्ली संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार सभारभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना बनकर म्हणाले , बसव मंडळांनी डॉल्बी फाटा देऊन हा सामाजिक उपक्रम चागल्या पध्दतीने राबविला आहे. या मंडळाचा आदर्श सर्व मंडळांनी घ्यावा असा उपक्रम आहे. आज पंढरी आबा जे सामाजिक कार्य राबवित आहेत तो आदर्श आहे. त्याचा आदर्श घेऊन डोर्लीत असे पंढरी आबा निर्माण होतील अशी आशा व्यक्त करतो.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांनी डॉल्बीमुळे आरोग्यास इजा निर्माण होते. मंडळांनी आदर्शवत काम करावे सामाजिक सलोखा निर्माण करावा असे मत व्यक्त केले.तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, गणेश मंडळांनी वॉटरकप पाणी फौंडेशन मध्ये सहभागी होऊन गाव पाणीदार करण्यास भर द्यावा. तसेच गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी मंडळांनी बसव ग्रुपसारखा आदर्श घेऊन शैक्षणिक कार्यास हातभार लावून आदर्श निर्माण करावे असे मार्गदर्शन उपस्थितांना केले.

यावेळी केंद्रप्रमुख कबाडे , सरपंच विजयालक्ष्मी पाटील, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष धनाजी पाटील, नागेश पाटील रामगोडा पाटील, बसव ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, ग्रामस्थ,विद्यार्थी, पालक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक रघुनाथ जाधव सर यांनी केले तर आभार पुड यांनी मांनले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महामित्र अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे निघाले सरकारच्या अब्रुचे धिंडवडे

swarit

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

News Desk

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टीका

News Desk