HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा बदला घेऊ !

इस्लामाबाद | पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारताविरोधात पुन्हा आग ओकली आहे. पाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी ६ सप्टेंबर रोजी रावळपिंडीत कार्यक्रम झाला . या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानी लष्करप्रमुख बाजवा यांनी पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशोब चुकता करू असे बोलून भारताला अप्रत्यक्षरीत्या धमकीच दिली आहे . या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित होते.

पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा बदला घेऊ असे बोलून पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी एक प्रकारे भारताला चिथावले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी देशाच्या सीमेवर रक्त सांडले आणि आपल्या प्राणाची आहुती दिली त्या रक्ताचा हिशोब आम्ही चुकता करू असे बोलून त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धाच्या आठवणीने उजाळा दिला आहे. ते म्हणाले कि या युद्धातून आम्ही बरेच काही शिकलो. देशात दहशतवादी कारवाया झाल्या , देश उध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले . हे पाकिस्तान कधीच विसरू शकणार नाही .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिक संकटातून जाणारा देश न बघवल्याने जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या

swarit

…नाहीतर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा !

Gauri Tilekar

पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी व्हॉटस्ॲप प्रयत्नशील

News Desk