HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांसाठी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

मुंबई । वरळी-सी लिंकनंतर आता मुंबईकरांसाठी वर्सोवा-बांद्रे सी-लिंक हा सागरी मार्ग प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने मंगळवार (४ सप्टेंबर) रोजी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यात त्यांनी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक या सागरी मार्गाची घोषणा केली.

नवा सागरी मार्ग

या सागरी मार्गाच्या कामाची सुरुवात ऑक्टोंबर महिन्यात करण्यात येणार असून पाच वर्षात हा सागरी मार्ग पुर्ण करणार असल्याचा दावा म.रा.र.वि.म.मंडळाने केला आहे. वरळी सी-लिंक ते वर्सोवाला जाण्यासाठी तब्बल २ तास लागतात. वर्सोवा-बांद्रे सी-लिंकवरुन उभारल्याने मुंबईकरांची वाहतुक कोंडी फोडण्यासाठी नवीन सागरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने रिलाईन्स आणि अस्ताल्दी यांच्या संयुक्त विद्यामाने वर्सोवा-बांद्रा सी-लिंक उभारण्याचा बांधकान करारनामा लवकरच करण्यात येणार आहे.

कसा असेल वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

वर्सोवा-बांद्रे सी-लिंक हा सागरी मार्गाची लांबी ९.६० किमी असून याला (४+४ पदरी ) आहे. जोडरसत्यासह एकून सागरी मार्गाची लांबी १७.१७ किमी आहे. या मुख्य सागरी मार्गावर बांद्रा जोड रस्ता (२+२) पदरी, कार्टर रोड रस्ता (३+३पदरी), जुहू कोळीवाडी जोड रस्ता (२+२ पदर) आणि नाना नानी पार्क जोड रस्ता (३+३) पदरी अशा प्रकारे हा सी-लिंक असून त्याला अनेक जोड रस्ते जोडून वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा उत्तम मार्ग असल्याचे म.रा.र.वि.म.मंडळाने म्हाणाले आहे.

वेळेत काम न केल्यास काँन्ट्रॅक्टर दंड

पहिल्या टप्प्याचे काम येत्या ६ महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. काँन्ट्रॅक्टर यांने सहा महिन्यात पहिला टप्पा पुर्ण नाही केला. तर त्या काँन्ट्रॅक्टरला दंड आकारण्यात येणार आहे.

टोल वसुली

वर्सोवा-बांद्रा सी-लिंक

हा सागरी मार्ग कर्ज घेऊ बंधण्यात येत असून या मार्गावरील आकारण्यात येणारा टोल हा २०५२ पर्यंत टोल वसुली करण्यात येणार आहे. हा टोल वरळी-सी-लिंकच्या तुलने तीन पट असल्याचे म.रा.र.वि.म.मंडळाने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटच्या अपघात १ जण बुडाल्याची भीती

News Desk

आधुनिक यंत्र युगातही वाचन संस्कृती लोप पावणार नाही …

News Desk

गॅस कर्मचार्‍याला महिला कार्यकर्त्यांनी दिला ‘मनसे’ स्टाईलने चोप

News Desk