HW News Marathi
देश / विदेश

स्वातंत्र्य दिनाच्या आधी दिल्लीत भीतीचे वातावरण

नवी दिल्ली | देशभरात स्वातंत्र्य दिवसाची जय्यत तयारी सुरु असतानाच राजधानी दिल्लीत भीतीचे वातावरण दिसून येत आहे. कारण स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच देशाची राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी संध्यकाळी एक व्यक्ती भारतीय हवाई दलाच्या वेशात राजीव चौक मेट्रो स्थानकाजवळ संशयास्पद हालचाली करताना दिला. पोलीस या संशयास्पद व्यक्तीचा शोध करत आहे. हा दहशतवादी असल्याच्या संशयामुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एअर फोर्सच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने रविवारी सायंकाळी या संशयित व्यक्तीला हवाई दलाच्या वेशामध्ये पहिले. परंतु या संशयिताने गणवेशावर स्पोर्ट शुज घातल्याने ही बाब त्या निवृत्तअधिकाऱ्याला खटकली. कारण भारतीय सेनांचे अधिकारी कधीही सरकारी गणवेशावर स्पोर्ट शुज घालत नाहीत. त्यामुळे लगेचच यांची माहिती पोलिसांना दिली. आणि या प्रकरणाचा शोध सुरु झाला. काही दिवसांपूर्वीच जैश-ए- मोहम्मद ही आतंकवादी संघटना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घातपात घडवण्याची शक्यता असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिलेली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक; देशात मात्र…

News Desk

पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

News Desk

अमित शहांच्या मुलांची संपत्ती १६ हजार पटींनी वाढली

News Desk