पोलादपूर | महाबळेश्वरला शनिवारी सकाळी सहलीसाठी जात असलेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचा-यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूस खोल दरीत कोसळून ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला. आतापर्यंत घटनास्थळीवरून ट्रेकर्स आणि एनडीआरएफकडून दरीतून २७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एनडीआरफकडून अजून मृतदेहा काढण्याचे काम सुरू आहे.
#Maharashtra: 27 bodies have been recovered till now from the site of accident in Raigad's Ambenali Ghat where a bus fell in a gorge yesterday claiming more than 30 lives; #LatestVisuals from the site of accident pic.twitter.com/sWra655swD
— ANI (@ANI) July 29, 2018
#Raigad bus accident: Search operation will continue as we have spotted few more bodies. We need to check if there are bodies underneath the bus- Vairavanathan, Deputy Commandant, NDRF #Maharashtra pic.twitter.com/HosSP67561
— ANI (@ANI) July 29, 2018
सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने सायंकाळी सहापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. यानंतर घटनास्थळी एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशनचा ताबा घेतला. हा दुर्गम भाग असल्याने एनडीआरएफच्या जवानांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा वेग मंदावला. मृतदेह बाहेर काढण्यात विलंब होत असल्यामुळे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.
अपघातातील मृतांची नावे
हेमंत सुर्वे, विक्रांत शिंदे, राजेश सावंत, एस. गुजर, डी. डी. धायगुडे, पंकज कदम, संदीप झगडे, संतोष झगडे, संदीप सुवरे, स्वप्नील देसाई, विनायक सावंत, संतोष पवार, महेंद्र कोरडे, सचिन झगडे, सुयश बाळ, संतोष जळगावकर, रोषन तब्बी, एस. शिंदे, आर. पागडे, प्रमोद शिगवण, निलेश तांबे, सचिन गिमव्हणेकर. राजेंद्र बडबे, सुनील सारळे, प्रमोद जाधव, सुनील कदम जयंत चोगले, राजेंद्र रिसबुड, संजय सावंत, प्रशांत भांबडी, श्रामेश जाधव, राजाराम गावडे ही मृतकांची नावे आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.