HW News Marathi
देश / विदेश

हार्दिक पटेल यांना न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

अहमदाबाद | पटेल आंदोलनादरम्यान 2015 साली भाजपाचे आमदार हृषिकेष पटेल यांच्या कार्यालयाची मोडतोड केली होती. त्या प्रकरणी न्यायालयाने पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल याला दोषी ठरवले असून, त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 2015 साली गुजरातमध्ये हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला कालांतराने हिंसक वळण लागले होते. त्यावेळी भाजपा आमदार हृषिकेश पटेल यांच्या विसनगर येथील कार्यालयाची मोडतोड करण्यात आली होती.

सदर प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर बुधवारी निकाल देताना विसनगर येथील न्यायालयाने ही पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना शिक्षा सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अबब.. 153 किलोचा समोसा पाहिला का?

News Desk

कोरोनाचा महाराष्ट्रात तिसरा बळी , देशात ८ रूग्णांचा मृत्यु

Arati More

दिल्लीच्या चांदनी महल भागातील १३ मशिदीमध्ये राहणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ कोरोना पॉझिटिव्ही

News Desk