HW News Marathi
संपादकीय

मुंबईत २६ जुलैची पुनारावृत्ती होऊ शकते ?

मुंबई | मुंबई शहरात २६ जुलै २००५ रोजी एका दिवसात मुंबईत ९४४ एम एम इतका पाऊस झाला तेव्हा कलिना, सहारा रोड, बीकेसी आणि धारावी या परिसरातील नागरीकांना सर्वाधिक धोका निर्माण झाला होता. खाडीचा परीसर म्हणून ओळखल्या जाणा-या ठाणे, भिवंडी, मुंब्रा आणि कळवा , उल्हास नगर थोडी अतिवृष्टी झाल्यास अत्यंत धोकादायक होतात. त्यामुळे पावसाळ्यात या परीसरात रहाणा-या नागरीकांना पूरजन्य परीस्थितीचा सामना करावा लागतो.

सरकारच्या आपघात प्रबंधक समितीला सल्ल्गार असलेल्या आरएमएसआयच्या म्हणण्यानुसार बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), ठाणे, भिवंडी आणि अँटोप हिल हे अतिवृष्टीमध्ये अत्यंत धोकादायक विभाग आहेत.

जदल गतीने होणारे शहरीकरण हे पुरग्रस्त परीस्थितीचे मुख्य कारण

महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थापन अपुरे पडते. त्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचते. त्यामुळे परिणामी नागरीकांना पुरग्रस्त परीस्थितीचा सामना करावा लागतो. आरएमएसआयचे पुष्पेंद्र जोशी यांच्या माहितीनुसार मुंबई शहर हे बेटाचा भाग असल्यामुळे अतिवृष्टीमध्ये पुराचा जास्तीत जास्त धोका मुंबई शहराला असतो. कारण भरतीच्या वेळी समुद्रातून बाहेर जलद गतीने बाहेर पडणारे पाणी शहरांमध्ये घुसते परंतु त्या पाण्याचा निचरा तितक्याच जलद गतीने होत नाही त्यामुळे पुरग्रस्त स्थिती निर्माण होते.

त्यामुळे पाण्याचा निचरा जलद गतीने होणे गरजेचे असते परंतु मुंबई हे बेट असल्यामुळे तसेच चौफेर समुद्र असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो आणि पुरग्रस्त स्थिती निर्माण होते. तसेच ठाणे आणि भिवंडी या परीसरात नवनवीन बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे त्या परीसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती संपुष्टात येत आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

वसई विरारला अतिवृष्टीचा धोका नाही…

आरएमएसआयच्या मुल्यांकनानुसार वसई-विरारला पुराचा जास्त धोका नाही. यंदाच्या पावसात वसई विरार तुंबण्याचे एकमेव कारण म्हणजे अतिजास्त प्रमाणात झालेला पाऊस पाण्याचा निचरा नालेसफाई न झाल्यामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वसई विरार शहरात पुरग्रस्त परीस्थिती निर्माण झाली होती. आरएमएसआयच्या माहीतीनुसार पुरग्रस्त परीस्थिती निर्माण झाल्यास नियंत्रण ठेवण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे हा धोका निर्माण झाला होता.

सरकारने अद्याप या परीसरात निर्माण होणा-या पुरग्रस्त परीस्थितीवर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. परंतु मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे माजी मुख्य प्लानर व्ही. के. फाटक म्हणाले वेळोवेळी या बाबींचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच अत्याधुनिक पद्धतीने हवामान बदलाचा अभ्यास होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. मात्र सरकारने यावर कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.

जलपर्णीचा नाश…

जलपर्णीचा नाश हा २६ जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या पुराचे मुख्य कारण होत. तसेच या जलपर्णीचे संरक्षण व्हावे यासाठी नंतर सीआरझेड सारखे कायदा आला. जलपर्णी संरक्षणानाच्या मोहीमा राबविण्यात आल्या. परंतु जलपर्णींची –हास सरकार थांबवू शकलेले नाही. जलपर्णी –हास होत असल्याचे अनेक अहवाल आयआयटी मुंबईने सरकारला दिले आहेत.

येत्या २६ जुलै ला २००५ च्या महापुराला १३ वर्षे पुर्ण होतील. प्रचंड वेगाने धावत असलेल्या या शहराला प्रत्येक पावसात बुडावे लागते ही वस्तुस्थिती आहे. पुरग्रस्त विभागात कुठलीच कठोर पाऊले महापालिकेने न उचलल्यामुळे दरवर्षी परीस्थिती जशास तशी असते. यंदाचा पावसाळा संपत आला आहे. यंदा मुंबईला तितकीशी पावसाची झळ बसली नाही मात्र प्रशासन कठोर पाऊले उचलण्यासाठी २६ जुलै च्या पुनरावृत्तीची प्रतिक्षा करत आहे का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे बंधू एकत्र आले तर…

swarit

मनमोहन सिंग जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान

News Desk

कॉंग्रेसचा मुंबई अध्यक्ष मराठी व्यक्तीच का नाही ?

News Desk